मंत्री तनपुरे म्हणाले… ऊर्जा खातं हे मी घाबरत- घाबरत घेतले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्यात सध्या वीजबिल मुद्दा चांगलाच गाजत आहे. महावितरणचे वीजबिलाबाबतचे सक्तीच्या धोरणावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मत व्यक्त केले. महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केद्र सरकारचा डाव आहे.

भविष्यामध्ये अदानी-अंबानी यांच्याकडे ही कंपनी गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शेतकरी हितासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात.

शेतकऱ्यांनी आपले वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच याच मुद्द्याच्या अनुषंगाने पुढे बोलताना ते म्हणाले कि, ऊर्जा विभागात काम करणं हे खरंतर आव्हानात्मक होतं.

तरी शेतकऱ्यांची सेवा करता यावी म्हणून हे ऊर्जा खातं हे मी घाबरत- घाबरत घेतले. राज्यात महावितरण कंपनीची ६० हजार कोटी थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते.

शेतकऱ्यासाठी नवीन ऊर्जा धोरण आणले आहे. थकीत शेतकऱ्यांच्या वीज बील थकबाकीत सवलत देऊन दंड माफ केला. या योजनेमधून शेतकऱ्यांना अधिकाधिक सवलती देऊन ६५ वीजबिलात माफी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24