मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नांनी ‘त्या’ देवस्थानला निधी मंजूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील श्रीक्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी शासनाकडून काही निधी प्रलंबित राहिल्यामुळे येथील विविध विकास कामे रखडली होती.

परंतु येथील ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रखडलेला निधी पुन्हा एकदा संबंधित विभागाकडे वर्ग झाला आहे.

लवकरच उर्वरित कामे देखील पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजेंद्र पाठक व ग्रामपंचायत सदस्य अजय पाठक यांनी दिली.

पर्यटन विकास निधी मिळवण्यासाठी माजी सरपंच सारिका पाठक यांनी प्रयत्न केले होते. श्रीक्षेत्र ढोलेश्वर येथे सभामंडप बांधणे, स्वच्छतागृह बांधणे,

वाहनतळ विकसित करणे, अंतर्गत रस्ते विकसित करणे यासाठी हा ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी या ठिकाणचे ७० टक्के काम पूर्ण देखील झालेले आहे.

परंतू उर्वरित कामे निधी अभावी रखडलेले होते ते प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मंत्री तनपुरे यांच्या माध्यमातून पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी स्वत: पाठपुरावा केल्याने उर्वरित रखडलेला निधी देखील मंजूर झाला आहे.

लवकरच उर्वरित सर्व प्रलंबित कामे या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याची माहिती सरपंच राजेंद्र पाठक व ग्रामपंचायत सदस्य अजय पाठक यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24