मंत्री, खासदार, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आघाडीच्या मंत्री, खासदार, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही.

त्यांना बांगड्यांचा आहेर दिला जाईल याचे भान ठेवावे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचे महविकास आघाडीचे षडयंत्र असून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नसेल,

तर या सरकारला घरी पाठवा, असे आवाहन भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी केले.

शनिवारी अकोले तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसह ओबीसींमधील महिला, तरुण आक्रमक होत रस्त्यावर उतरला. अकोले बसस्थानकासमोरील कोल्हार-घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात आले.

माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, पंचायत समितीच्या सभापती व भाजप ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष ऊर्मिला राऊत,

भाजपचे तालुकााध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे, रेश्मा गोडसे यांनी चक्का जाम आंदोलन केले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वकील वसंत मनकर, गीरजाजी जाधव, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश सांकुरे, संतोष बनसोडे,

गोकुळ कानकाटे, संदीप दातखिळे, ज्ञानेश पुंडे, यशवंत आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, शेखर वालझडे, किशोर काळे, हितेश कुंभार उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24