मंत्री घरात बसून काम करतात, फडणवीस सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  कोरोना काळात फडणवीस हे राज्यातील सामान्य माणसांच्या जीवाला जीव देऊन, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून घाबरलेल्या जनतेला अधार देण्याचे काम करीत आहेत. आज अनेक नेते, मंत्री घरात बसून जपून काम करीत आहेत.

मात्र, फडणवीस यांनी संकटाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना बळ देत त्यांना लागणारी मदत करण्याचे काम फडणवीस उत्तम करीत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोपरगाव येथील कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर जावून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोल्हे बोलत होते. कोल्हे म्हणाले, सध्या एकमेकावर टिका करण्याची ही वेळ नाही.

करोनाच्या संकटाने बाजारपेठा ठप्प झाल्याने आर्थिक उलाढाल मंदावली. व्यापारी आडचणीत आहे. बेरोजगारी वाढली, कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले. शाररीक व नैसर्गिक संकटाने शेतकरी अडचणीत असल्याने केंद्र व राज्य सरकारमध्ये अशावेळी समन्वय असणे गरजेचे आहे.

सरकारने एकमेकांच्या हातात हात घालून काम करावे. आशा संकटाच्यावेळी खऱ्या नेतृत्वाची कस लागते. जनतेत जावून काम करणारे अभ्यासु नेते म्हणजे फडणवीस यांची ख्याती आहे.

अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे म्हणूनच त्यांच्या सरकारच्या काळात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकवून दाखवले.

त्यानंतर सध्याचे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कमी पडल्याने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले. माजी आमदार स्व. गंगाधरराव फडणवीस यांच्या सहवासातील आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24