मिरी-तिसगाव योजना होणार पुनर्जिवित, मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- पाथर्डी, नगर, राहुरी तालुक्यातील सुमारे ३३ गावांचा समावेश असलेल्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेची झालेली दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अनेक लाभधारक गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या संपूर्ण योजनेचा जल जीवन मिशन अंतर्गत सर्व्हे करून घेणार आहेत.

नंतर ज्या तांत्रिक बाबी पुढे येतील, त्यानंतर उपाययोजना करून प्रत्येक लाभधारक गावाला पूर्ण दाबाने पाणी देण्याचे नियोजन आहे. सुरुवातीपासूनच मतदार संघातील मिरी-तिसगाव योजनेसह वांबोरी, सोनगाव-सात्रळ, धानोरे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभधारक गावाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा, पाण्याचे प्रश्न नेहमीच गांभीर्याने घेण्याचे काम तनपुरे यांनी केले.

सुरुवातीपासूनच त्यांनी पाणी प्रश्नात बारकाईने लक्ष घातले. मिरी-तिसगाव नळ योजनेच्या सर्व्हेनंतर वांबोरी, सोनगाव-सात्रळ, धानोरे या नियोजनाचा देखील सर्व्हे करण्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नियोजन आहे.

जलजीवन आराखड्यानुसार मिरी-तिसगाव योजनेच्या नवीन प्रस्तावित कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सल्लागाराची नेमणूक झाल्याने मंगळवार, २७ जुलैपासून या संपूर्ण योजनेचा सर्व्हे सुरू होत आहे.

यामध्ये ज्या गावांना पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नाही, पाईपलाईन दुरुस्ती, एअरवॉल दुरुस्तीच्या अडचणी निर्माण होत आहेत, त्या दुरुस्त करून प्रत्येक लाभधारक गावाला पूर्ण दाबाणे पाणी देण्याचे नियोजन मंत्री तनपुरे यांच्या माध्यमातून होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24