अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेता ठरलेल्या मान्या सिंह (मिस इंडिया रनर्स अप) या रविवार दि. 19 सप्टेंबरला शहरात येत आहे. मोरया युवा प्रतिष्ठाण मंडळाच्या गणेश विसर्जनाकरिता त्या उपस्थित राहणार आहे.
त्यांना मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अर्जुन मदान यांनी गणेश विसर्जन करिता आमंत्रित केले आहे. गुलमोहर रोड येथे हा कार्यक्रम आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. कु अपर्णा मदान यांच्यावतीने सदर नियोजन होत आहे.
मिस इंडिया मान्या सिंह महिला व युवतींसह प्रबळ इच्छा शक्तीने मिस इंडिया पर्यंतचा प्रवास या विषयावर संवाद साधणार आहेत. मान्या या उत्तरप्रदेश मधील एका रिक्षाचालकाची मुलगी असून, तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर मिस इंडिया उपविजेती पदा पर्यंत मजल मारली आहे.
ती स्पर्धा जिंकली नसली तरी, देशभर तिच्या नावाची चर्चा होती. मॉडलिंग क्षेत्रात करिअर करत असताना घर सोडून एका युवतीने अतीशय खडतर प्रवास करुन तिने आपल्या ध्येया पर्यंत जाण्याची हिंमत दाखवली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असताना किशोर वयात नोकरी केली.
तिचा हा खडतर प्रवास आजच्या युवतींसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. सेवाप्रीत, लायन्स क्लब व घर घर लंगर सेवेच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होणार असून, सेवाप्रीतच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेल्या क्युट बेबी स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मोरया युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अर्जुन मनोज मदान यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अभिनव अंबाडे, ललित पोटे, सागर सारडा, निलेश असराणी, गोवर्धन कांडेकर, भुषण फटांगरे, तेजस रासकर, शशांक मालपाणी, मनोज मदान, मदान कुटुंबीय, तेज वॉच कंपनी आदी परिश्रम घेत आहेत.