अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना तत्कालीन सरकारने थेट जमीन खरेदीच्या पर्यायात रेडीरेकनरच्या पाच पट रक्कम मोबदला देवून समृद्धी नेच शेतकऱ्यांना समृद्ध केले.
जमिनी अधिग्रहणचा कायदा झाल्यामुळे आता बुलेट ट्रेनसाठी जमिनी अधिग्रहित केल्यास त्या शेतकऱ्यांना सुद्धा भरपूर मोबदला मिळेल.
समृद्धीचा मोबदला माझ्यामुळेच मिळाला आणि आता बुलेट ट्रेन साठी सुद्धा मीच जादा मोबदला मिळवून देईन, अशा खोट्या वल्गना करून कोणी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, अशी टीका चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी केली.
समृद्धी महामार्गाचे काम आणखी लांबणीवर पडू नये यासाठी उर्वरित जमीन भूसंपादन कायद्याने संपादित करण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मागितली आहे.
थेट खरेदीऐवजी भूसंपादन कायद्याद्वारे जमिनी दिल्यास मोबदला कमी मिळेल, या धास्तीने शेतकरी आता जमिनी देण्याची तयारी दाखवू लागले आहेत.
सद्य:स्थितीत थेट खरेदीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला दिला जातो आहे. याशिवाय झाडे, पिके, विहिरी, बांधकामाचे मुल्यांकन करून त्याची वेगळी रक्कम संबंधित मालकांना दिली जात आहे.