आमदार लंके यांनी ‘तो’ शब्द पाळला! बिनविरोध ग्रामपंचायतींना दिला २५ लाखांचा निधी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- बिनविरोध निवडणूक करा, ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो. असे आवाहन करणाऱ्या आ. लंके यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना ‘तो’ निधी मंजुर करण्याची जबाबदारी पार पाडली आहे !

तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडूकांदरम्यान आ. नीलेश लंके यांनी मतदार संघातील नागरीकांना बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो असे आश्‍वासन आ. लंके यांनी दिले होते.

आ. लंके यांनी केलेल्या या आवाहानास राज्यभर प्रसिद्धी मिळाली. विधानपरीषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लंके यांच्या आवाहनावर शंका उपस्थित करीत इतका मोठा निधी कोणी देउ शकत नाही, हा राजकिय स्टंट असल्याची टिका केली होती.

त्यावेळी आ. लंके यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मी दिलेला शब्द पाळणारा आहे, वाचाळविर नाही असे सांगितले होते. मतदारसंघातील विरोधकांनीही आ. लंके यांच्यावर टिकेची झोड उठविली होती.

तालुक्यातील तब्बल ७० ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत असा दावा करीत लंके समर्थकांनी आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्याची जाहिरातबाजीही केली होती. लंके समर्थकांच्या दाव्यानुसार तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या.

त्यापैकी हंगे, शिरापूर, रांधे, कारेगांव, वेसदरे, पिंप्रीपठार, जाधववाडी,  भोयरेगांगर्डा व पळसपूर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.  तसेच नगर तालुक्यातील आकोळनेर ही ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली.

आ. लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक गावांमध्ये सकारात्मक वातवरण होते. मात्र विरोधकांनी खोडा घातल्याने सुमारे पन्नास टक्के  ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध होउ शकल्या नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24