आमदार लंके म्हणतात अशी वक्तव्य यापुढे खपवून घेणार नाही …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- सोलापूर इथं बुधवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत..

गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ते घोंगडी बैठका घेत आहेत. काल सकाळी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

पडळकरांनी केलेल्या या टीकेमुळंच त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली असावी, असं बोललं जात आहे शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

सोलापूरात बुधवारी पत्रकार परिषद संपल्यानंतर पुढील कार्यक्रमाला जाताना पवारांच्या एका कार्यकर्त्यांने गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. गोपीचंद पडळकर गाडीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने थेट मोठा दगड गाडीच्या काचेवर फेकला.

या हल्ल्यात गोपीचंद पडळकरांना काही दुखापत झाली नसून गाडीच्या काचेचे नुकसान झालं आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकरांचा समाचार घेतला.

शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेते आहेत. त्यांच्यावर खालच्या शब्दात टिका करणं शंभर टक्के चुकीचे आहे. यापुढे अशी विधानं खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी पडळकरांना दिला.

याबाबत निलेश लंके म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर जे काही म्हणाले ते शंभर टक्के चुकीचे आहे. महाराष्ट्राची भूमी महिलांचा मानसन्मान करणारी आहे. एखाद्या लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे वक्तव्य करणं शोभत नाही.

गोपीचंद पडळकरांनी यापुढे बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्य यापुढे खपवून घेणार नाही असं लंके यांनी पडळकरांना सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24