आमदार लंके निंबळकचा ‘हा’ प्रश्न कायमचा सोडवणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- वेळेवर पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. हा गंभीर प्रश्न आहे. विधानसभेत या बाबत प्रश्न उपस्थित करून, निंबळकचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार. तसेच येथे विकासकामासाठी भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आ. निलेश लंके यांनी सांगीतले .

नगर तालुक्यातील निंबळक येथे नूतन सरपंच प्रियंका लामखडे व उपसरपंच बाळू कोतकर यांनी पदभार स्वीकारला. त्या प्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विलासराव लामखडे हे होते.

यावेळी आमदार लंके म्हणाले की, सरकार महाआघाडीचे असल्यामुळे निधी ची कमतरता येणार आहे पारनेर नगर मतदार संघातील गावाना विकास कामात कमी पडणार नाही .गावचे प्रलंबित असलेले सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील.आता निवडणूक संपली असून सर्वांना सोबत घेऊन कामे केली जातील असे आ. लंके म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24