अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे दरदिवशी अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे,. यातच जिल्ह्यातील अनेक गावात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होऊ लागला असल्याने अनेक ठिकाणी गावांनी स्वयंपुरतीने लॉकडाऊन करण्यात आला आहे.
यातच पारनेर तालुक्यांमध्ये सातत्याने रुग्ण वाढ होत आहे यापूर्वीही पाच दिवसाचा कडक लॉक डाऊन पारनेरमध्ये लावण्यात आला होता दि. 3 पासून किराणा दुकान व आदी गोष्टींसाठी निर्बंध कमी करण्यात आले होते.
मात्र पुन्हा गेल्या काही दिवसापासून दैनंदिन कोरोना रुग्ण संख्या अडीशे तीनशे पार झाली असल्याने व मृत्यू होत असल्याने तालुक्यात दि.६ पासून ११ पर्यत अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल व मेडिकल वगळता कडक लॉकडाउन लावण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
दवाखाने, मेडिकल व दूध डेअरी सोडून सर्व बंद दवाखाने, मेडिकल २४ तास तर दूध डेअरी चालू राहणार आहे. बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान पारनेर तालुक्यामध्ये रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नागरिक मात्र अद्यापही बेफिकिरीने वागत आहेत. काही प्रमाणात निर्बंधात सूट दिली याचा गैरफायदा अनेक नागरिक घेत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे.