अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- राजधानी दिल्ली येथे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. गेले वर्षभरात अनेक सामाजिक व राजकीय कामे केल्या कारणाची दखल घेत महाराष्ट्रातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली त्यात राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेश लंके यांचा समावेश आहे.
आज नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात लोकमत समूहाचे चेअरमन व सर्व संचालक व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत, पारनेर नगर तालुक्यातील या जननायकास हा सन्मान मिळाला .
यावेळी आमदार निलेश लंके यांनी सांगितले की हा सन्मान माझा नसून गेले कित्येक दिवस कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वाडीवस्तीवर जात योगदान देणाऱ्या व मला माझ्या सामाजिक कार्यात सावलीसारखे माझ्या पाठीमागे राहणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांचा आहे.
असे यावेळी आमदार निलेशजी लंके यांनी सांगीतले. महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे आमदार निलेश लंके यांना राजधानी दिल्ली येथे खासदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच राजेंद्र दर्डा, योगेश लखनो, ( ब्राईट आसूटे ) ऋषी दर्डा ,
अखिलेश प्रसाद सिंग, खासदार प्रतापराव जाधव ,खासदार कुणाल तुमाणे संदीप सिंग व्हाईस प्रेसिडेंट ( B. K.T ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला गेला.