अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- पारनेरचे आमदार नीलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले. त्यावेळी त्यांचे चाहत्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
नीलेश लंके या ठिकाणी दाखल होताच त्यांना पुष्पगुच्छ, हार देण्यात आले. यावेळी भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे, किरण सूर्यवंशी, प्रणव वाणी, नितीन वानखेडे, रणजित लांडे, राहुल हासवाल, भूषण वडांगळे,
अभिषेक कोकाटे, निशांत झावरे, आदित्य गुजराथी, वासुदेव शिंदे, सागर पवार, विनोद परदेशी, संदीप देशपांडे, संदीप जाधव, कुणाला घनघाव, नीलेश शिंदे, संदीप देशपांडे, राहुल देशपांडे, पत्रकार शैलेश शिंदे, कुणाल जायकर, राहुल देवरे, अॅड. राहुल झावरे, दादा शिंदे, बाबापू शिर्के, अशोक घुले, राजेंद्र चौधरी,
सचिन पेटारे, सुनील कोकरे, अविनाश जाधव, गणेश साळवे, बाळासाहेब ब्राह्मणे, भाऊसाहेब रासकर, भाऊ साठे, सत्यम निमसे, दादा दळवी, प्रवीण वारुळे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नीलेश लंके म्हणाले, संपूर्ण आयुष्य हे जनसेवेसाठी वाहून घेतलेले असून कोरोना काळात केलेले काम हे माझे कर्तव्यच होते.
जर मी घाबरून घरात बसलो असतो, तर इतके लोकं बरे होऊन जाऊ शकले नसते. प्रत्येक माणूस वाचला पाहिजे हेच उद्दिष्ट होते. मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना वाचवलेलं असून मी फार वेगळे काम केलेले नाही असेही यावैही आमदार नीलेश लंके म्हणाले.