अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- “कोरोनाच्या काळात ज्यांनी स्वत:चा विचार न करता लोकांची सेवा केली त्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक विचार करत आहे.जर तिसरी लाट आलीच तर तिसऱ्या लाटेमध्ये देखील भीती न बाळगता आपण काळजी घेतली पाहिजे.
” असं देखील आमदार लंके यांनी म्हटलं आहे. “कोरोना काळात ८० टक्के मृत्यू हे केवळ भितीमुळे झाले. त्यामुळे या लोकांची भिती घालवण्याचं काम मी केलं. औषधांपेक्षा रुग्णांची मानसिकता बदलून जवळपास २५ हजार रुग्ण कोरोनामुक्त केले. त्यामुळे आता डिग्री न घेताही मी अनुभवातून 50% डॉक्टर झालोय.
” असं वक्तव्य आमदार निलेश लंके यांनी केलं आहे. ते बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे आयोजित कोरोना योध्द्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, “कोरोनाच्या काळात ज्यांनी स्वत:चा विचार न करता लोकांची सेवा केली त्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक विचार करत आहे.
जत तिसरी लाट आलीच तर तिसऱ्या लाटेमध्ये देखील भीती न बाळगता आपण काळजी घेतली पाहिजे.” “कोरोना काळात ८० टक्के पेशंटचे मृत्यू केवळ भीतीपोटी झाले आहेत. लोकांच्या मनातील भीती घालविणे हे खुप प्रभावी औषध असल्याने मी रुग्णांमध्ये मिसळलो आणि त्यांची सेवा केली.
आणि कोरोना झाल्यावर त्यांच्या मनता जे नकारात्मक विचार येतात ते विचार काढण्याचे काम केलं.” “ज्या काळात रक्ताच्या नात्याचे लोक जवळ येत नव्हते त्या वेळी लोकांना आधार देण्याचे काम कोविड सेंटरच्या माध्यमातून केले. ज्या रुग्णांची शुगर लेव्हल 700, ऑक्सिजन लेव्हल 60 होती असे 68 वर्ष वयाचे रुग्ण देखील ठणठणीत बरे होऊन घरी गेले.”