अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पुत्रपाप्तीसंबंधी विधान केल्याने न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या बाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता टीका केली आहे.
‘सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती म्हणत बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?’ असा सावल वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता केला आहे.आमदार निलेश लंकेचे कौतुक इंदोरीकर महाराजाना महागात पडणार आहे. कारण इंदुरीकर यांना भविष्यातील संगमनेर तालुक्यातील भाजपचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
अशा परिस्थितीत वाघ यांनी घेतलेली ही भूमिका धाडसी मानली जात आहे. महिलांबद्दल भेदभाव करणारी विधाने करतात, म्हणून इंदुरीकर यांच्या यापूर्वीही विविध महिला संघटनांकडून टीका झालेली आहे. आमदार निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
त्यामध्ये इंदुरीकरांचेही कीर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी आमदार लंके यांचे मोठे कौतूक केले. इदुरीकर म्हणाले होते, ‘हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती आपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली तर तुम्ही त्याकडे लक्ष ने देता तुमची यशाच्या दिशेने सुरू असलेली
वाटचाल सोडू नका,’ असेही इंदुरीकर म्हणाले. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपप्रकरणातून वाघ यांनी ही टीका केली आहे. लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप तयार केली होती. नंतर ती समाज माध्यमांतून व्हायरल झाली.
लोकप्रतिनिधी म्हणजे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके होय. देवरे यांनी त्यांचे नाव घेतले नसले तरी लंके यांनी स्वत: पुढे येऊन आरोप फेटाळले होते. या प्रकरणात सुरवातीपासून वाघ यांनी देवरे यांची बाजू लावून धरली आहे. या अनुषगांने वाघ यांनी एक ट्वीट केले आहे,
त्यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील भोळ्या भाबड्या भगिनी मन लाऊन ज्यांचं किर्तन ऐकतात त्या ह.भ.प नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणाऱ्या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’ अशी करणं अतिशय दुदैवी… या सत्तेतील बेलगाम घोड्यांना ‘हत्ती’ म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?’ असे वाघ यांनी म्हटलं आहे.