अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- अयोध्याच्या पावनभूमीत भव्य राम मंदिराची उभारणी होत आहे. व प्रसारमाध्यमांवर प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिरास स्वच्छेने देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार निलेश लंके यांनी राममंदिर उभारणीसाठी १ लाख ३३३ रूपयांच्या देणगीचा धनादेश दिला.
रविवारी पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण मतदार संघाच्या कुटुंबाचा एक जबाबदार कुटुंब प्रमुख म्हणून राजकारणाबरोबर धार्मिक अस्मिता जपत आयोध्या येथे साकारत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरासाठी,१,००,३३३ / रु ( एक लाख तिनशे तेहतीस रु ) इतक्या देणगीचा धनादेश दिला.
आ. लंके यांनी सदर धनादेश समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त कैलास गाडीलकर सर,मधुकर लोकरे, संतोष वारे,विकास थोरात,अक्षय शहाणे यांच्याकडे सुपर्द केला.या वेळी आमदार निलेश लंके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस, निलेश लंके प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी, हितचिंतक व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.