बैलगाडा शर्यतीवरुन आमदार पडळकर म्हणाले…’जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारचं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- बैलगाडा शर्यतीवरुन सांगलीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पोलीस आमनेसामने आले आहेत. बैलगाडी शर्यतीला न्यायालयाकडून बंदी असताना सांगलीत पडळकर यांनी २० ऑगस्ट रोजी झरे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले.

‘जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारचंट, असे म्हणत गोपिचंद पडळकरांनी पोलिसांना आव्हान केले आहेत. पोलिसांची कारवाई सुरू असताना पडळकरांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस आणि पडळकरांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली.

‘जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारच. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. आम्ही बैलगाडा शर्यत भरवणारचं’, असा आक्रमक पवित्रा पडळकरांनी घेत महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीचे गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. त्यांनी आमच्या शेतकऱ्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे, अशी टीका देखील पडळकरांनी केली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदी असलेल्या बैलगाडा शर्यत घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यासाठी त्यांनी बक्षिसही जाहीर केलं आहे. सांगली जिल्ह्यातील झरे गावात 20 ऑगस्ट रोजी ही शर्यत घेणार असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलं आहे. या शर्यती बाबतीत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार, असं विचारलं असता जयंत पाटील यांनी इशारा दिलाय.

त्याचबरोबर बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात ही लोकांची मागणी आहे, असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे.

ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24