अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे नगर, सोलापूर, पुणे या तीन जिल्ह्यांना आमदार रोहित पवार यांनी मोफत वाटप केलेे.
याबाबतची माहिती आमदार रोहित पवार यांनी टि्वट करून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने हे वाटप करण्यात आले आहे.
रोहित पवार यांच्या हस्ते सोमवारी सोलापूरसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप पदाधिकाऱ्यांमार्फत सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द केले, अशी माहिती आमदार पवार यांनी ट्विट करून दिली आहे.
रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळबाजार करणाऱ्या कृत्रिम आणि टंचाई निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई केली जात आहे. सामान्य जनतेला रेमडीसीवीर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही, अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप केले.
राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहण्यास मिळत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी कोरोना रूग्णांच्या नातेवाईंकाचा सरकारकडे टाहो करत आहे.
तासंतास रांगेत उभे राहून सुद्धा रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नाही. राष्ट्रवादीच्या वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने याआधीही लॉकडाऊनच्या काळात गरजू लोकांना मदत करण्यात आली होती.
त्यामुळे यावेळी सुद्धा रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना मोफत वाटप करण्यात आले आहे.