अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जामखेडच्या खरीप पिक पुर्वनियोजनाचे गणित अखेर जुळले आहे. आमदार रोहित पवार यांनी राज्यासह परराज्यातूनही उपलब्ध बियाणे उपलब्ध केले आहे. गावांचे तीन गट करून कर्जत तालुक्यात ३५ तर जामखेड तालुक्यात घेतल्या ३० बैठका राजेंद्र पवार यांनी घेतल्या आहेत.
कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी विभाग व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेडची कृषिक्रांतीकडे वाटचाल होण्यासाठी आमदार पवारांसह आता त्यांचे वडील राजेंद्र पवार,
कर्जतचे कृषी अधिकारी दीपक सुपेकर आणि जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनीही या चळवळीत झोकून दिले आहे. आमदार रोहित पवारांनी या वर्षी घेण्यात येणाऱ्या पिकांबाबत बैठक घेतली. मात्र उडीद बियाणांचा मोठा तुटवडा असल्याने समजले.
बियाणे वेळेत मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार होते ही बाब लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.
शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नये म्हणून तुटवडा असतानाही संबंधित कंपन्यांकडुन वेळेत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. जर कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून बियाणे देण्यास टाळाटाळ झाली,
पर्यायी वस्तू नेण्याची सक्ती केली तर अशा केंद्रांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आमदार रोहित पवार यांनी कर्जत व जामखेडच्या कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देऊ नये अशा सुचनाच त्यांनी कृषी विभागाच्या दिल्या आहेत.