आमदार रोहित पवार म्हणतात : भाजपने जातीपातीचे राजकारण केले..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  विधानसभा निवडणुकीत पाथर्डीत चांगले वातावरण होते. पण शेवटी भावना व जातीपातीचे राजकारण करुन भाजपाच्या काही मंडळींनी युवकांची माथी भडकवली व ढाकणेंना पराभव स्विकारावा लागला.

मात्र त्यांचा संघर्ष वाया जाणार नाही. राष्ट्रवादीत न्याय दिला जातो. जनतेने सोबत रहावे आम्ही सोबतच विकासाची कामे करु. जनेतेने ज्याला विकास समजतो त्याला निवडुन दिले पाहीजे. अशी टीका आमदार रोहीत पवार यांनी आमदार राजळे यांचे नाव न घेता केली.

पाथर्डी येथे अँड.प्रताप ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अँड. ढाकणे यांच्या तिन पिढ्याचा संघर्ष मी पाहतोय. राष्ट्रवादीत जो संघर्ष करतो त्याला न्याय मिळतो. काम करणाऱ्यांना न्याय मिळतो.

भारतीय जनता पक्षात ज्यांनी संघटना वाढविली पक्ष सत्तेत आणला त्यांची आज काय अवस्था आहे, हे तुम्ही पाहत अहात. भाजपाला कोणी मोठ झालेलं आवडत नाही. कर्जत-जामखेडच्या विकासाचे काम मी करतोय.

तशीच परस्थीती पाथर्डी-शेवगावची आहे. विकासाच्या कामाला अँड. ढाकणे यांना सोबत घेवुन काम करु. शेवगावात घुले व पाथर्डीत प्रताप ढाकणे यांचे चांगले कार्य आहे. गेल्या वेळी शेवटच्या क्षणी गडबड झाली.

भाजपाने भावना भडकावल्या, जातीपातीच राजकारण केले आणि आपला निसटता पराभव झाला. परंतु जनेतेनेही विकास ज्याला समजतो त्यालाच निवडून द्यायला पाहीजे. अशीही टीका त्यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24