आमदार रोहित पवार म्हणाले युवा पिढी नैराश्यात …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने निराश होऊन पुण्यात एका २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून या वृत्ताने महाराष्ट्र हादरला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने राज्य सरकारकडे MPSC परीक्षा आणि नियुक्त्यांबाबत एक निवेदन दिले आहे.

रोहित पवारांनी MPSC परीक्षा त्वरित घेण्याबाबत तसेच प्रलंबित नियुक्त्यांबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे.

याविषयी ट्विट करताना रोहित पवार म्हणाले की, ‘कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC परीक्षा आणि प्रलंबित निकाल व रखडलेल्या नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे.

माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन MPSC परीक्षा त्वरित घेण्यात यावी. तसेच प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात’, अशी मागणी रोहित पवार यांनी सरकारकडे केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24