आमदार संग्राम जगताप यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी आमदार जगताप यांना सन्मानपत्र प्रदान केले.

यावेळी संभाजी पवार, राष्ट्रवादी सरचिटणीस गणेश बोरुडे, आढाव सर, दीपक खेडकर, प्रवीण शिंदे, अमोल येवले, श्रीकांत कुटे आदी उपस्थित होते.

शरचंद्र आढाव म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात आमदार संग्राम जगताप यांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले.

हातावर पोट असलेल्या श्रमिक कामगार कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रेशनिंग व किराणा किटचे वाटप केले.

अनेक गरजूंना रुग्णालयात बेड उपलब्ध करुन आयुर्वेद महाविद्यालयात कोविड सेंटरची उभारणी केली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देखील ते सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य करीत असून, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना कोरोना योध्दा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24