अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या जुळवूनघेण्याच्या सूचनेनुसार महापालिकेत शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौरअसे ठरले आहे.
त्या एक-दोन दिवसात दोन्ही पक्षांचे वरिष्ठ येथे येऊन उमेदवारी व अन्य नियोजन जाहीर करतील, असे स्पष्टीकरण शहराचे राष्ट्रवादीचेआमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिले. दरम्यान, काँग्रेसबाबत आपल्याला काहीहीमाहीत नाही.
पण, ते जर आमच्या समवेत आले तर त्यांनाही बरोबर घेतले जाईल, असेहीत्यांनी स्पष्ट केले.नगरच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक 30 जूनला ऑनलाईन होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आ. जगताप यांनी,महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत मला आता काहीसांगता येणार नाही.
पण मुंबईत वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनेनुसार निवडीहोणार आहेत आणि तसे मध्यंतरीच्या मुंबईतील वरिष्ठांच्या भेटीची छायाचित्रेहीहे स्पष्ट करून गेले आहे, असे स्पष्ट केले. शिवसेनेच्या काही नगरसेवकांशीमाझी चर्चा झाली आहे.
या दोन्ही पक्षांची समन्वय समिती केली असून, तिचे प्रमुखपद स्थायीसमिती सभापती अविनाश घुले पाहतात, ते दोन्ही पक्षांच्या सर्व संबंधित नगरसेवकांच्यासंपर्कात आहेत, असे सांगून आ. जगताप म्हणाले, माझ्या काही हातात नाही व मी उमेदवारही नाही.
लोकशाही प्रक्रियेनुसार निवड होत असते. नगरसेवक सर्व ठरवतअसतात. अर्थात माझ्याही मताला किंमत असते.
पण जेव्हा आमच्या नगरसेवकांना काही अडचण नाही, तेव्हा मला असायचे काही कारण नाही. नगरसेवकांनी जर वेगळी भूमिकामांडली तर मला काही लोकांशी चर्चा करावी लागते. पण बहुतांश निर्णय नगरसेवकचघेतात, असेही आ. जगतापांनी सांगितले.