अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-सत्तेसाठी एकमेकांना वाचविण्याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच सामान्य माणसांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
घरात बसून केलेला कारभार चव्हाट्यावर येण्याची भिती असल्यानेच सरकार आधिवेशनात चर्चेपासून पळ काढत असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार आधिवेशन घेण्याच्याच मानसीकतेत नाही. महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षभरात केवळ घरात बसून केलेला कारभार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.
त्यामुळे सामान्य माणसांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी ही सरकारची ईच्छा नाही. याकडे लक्ष वेधून कोव्हीड संकटात राज्यातील जनतेची महाविकास आघाडी सरकारने हेळसांड केली.
कोव्हीड संकटात महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेला कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही ही वस्तुस्थिती टाळण्यासाठी सरकार या मुद्यावर सभागृहात चर्चाच होवू देत नसल्याचे ते म्हणाले.
शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली असली तरी, बहुतांशी शेतकरी कर्जमाफीपासुन वंचित राहीले आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीत मदतीच्या केवळ घोषणा झाल्या, पुरेशी मदतही हे सरकार शेतक-यांना करु शकले नाही.
आणि आता धाक दडपशाहीने ग्रामीण भागातील विज जोडणी तोडण्याचा महाप्रताप या सरकारचा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतक-यांच्या भावना अतिशय तिव्र आहेत.
तसेच मंत्री मंडळातील मंत्र्यांनी वेळोवेळी विविध विभागात भरतीच्या घोषणा केल्या परंतू, एकाही विभागात नोकर भरतीची प्रक्रीया सुरु नसल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराष्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयीन प्रक्रीयेच्या नावाखाली सरकारने दुर्लक्षीत केला आहे. या सर्व प्रश्नांची चर्चा टाळण्यासाठीच सरकार जास्त कालावधीचे आधिवेशन घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आ.विखे पाटील यानी केला.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर बनला असून, जेलमधुन सुटलेले आरोपीच शस्त्र हातात घेवून राजरोसपणे रस्त्यावर नाचत आहेत. सरकारमधील मंत्र्यांनाच पाठीशी घातले जात असेल तर,
जेलमधून सुटलेले आरोपीही असे प्रकार करणाच असा टोला लगावून आ.विखे पाटील यांनी सांगिगतले की, मंत्री संजय राठोड यांच्याबाबतीतले सर्व पुरावे ऑडीओ क्लिपच्या माध्यमातून समोर आलेले असताना सुध्दा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही,
सरकार नेमके कोणाला पाठीशी घालतय? असा प्रश्न उपस्थित करुन सत्तेसाठी एकमेकांना पाठीशी घालण्याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडीमध्ये सुरु असल्याची टिका त्यांनी केली.
पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाच्या महीला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांना पुण्यातील पोलिसांनी दिलेली वागवणूक पाहाता पोलिसांवरही मोठा राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते.
त्यामुळेच आधिवेशनापुर्वी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा. मंत्री काय ब्रम्हदेव नाहीत, कायद्यापुढे सर्व समान आहेत. जोपर्यत मंत्रीमंडळातून बडतर्फ केले जात नाही तोपर्यंत आधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही आ.विखे पाटील यांनी दिला.