ताज्या बातम्या

मनसेत नाराजी नाट्य ! राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर वसंत मोरे नाराज; पक्षाची भूमिका मात्र ठाम

Published by
Ahmednagarlive24 Office

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी (Mosque Loudspeaker) वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.

मशिदीवरील (Mashid) भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर पुणे मनसेतून ही नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती मिळत आहे.

मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आणि साईनाथ बाबर (Sainath Babar) हे नाराज असल्याची माहिती मिळत होती. मात्र, साईनाथ बाबर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत नाराज नसल्यचे संकेत दिले आहेत.

पण नगरसेवक वसंत मोरे हे नाराज असल्याचे वृत्त मिळत आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संबुस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका सर्वांना मान्य आहे. वसंत मोरे यांचा काहीतरी गोंधळ झाला असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच मनसेकडून ही मोरे यांची ती वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वसंत मोरे हे कात्रजमधून 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.

वसंत मोरे यांच्या मतदार संघात मुस्लिम मतांची संख्या जास्त आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे वसंत मोरे याना अडचण निर्माण झाली आहे.

नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. नाराज असण्याचा प्रश्न नाही. साईनाथ बाबर हे नाराज असल्याची माहिती अख्या शहरभर पसरली होती. त्यानंतर आज त्यांनी याबाबत खंडन केले आहे.

साईनाथ बाबर हे कोंढवा संघातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. कोंढव्यात 70 टक्के मतदान मुस्लिमांचं आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेमुळे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office