केवळ १५ टक्के फी कपात म्हणजे जनतेची घोर फसवणूक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ती फी कपातीला १५ टक्के कपात केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने याबाबत निषेध नोंदवून शासनाने ५० टक्के फी कपात करावी.

अशी मागनी करण्यात आली, तसेच माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदवला. मागील दीड वर्षापासून कोरोना काळात सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

काही शाळा, कॉलेजेस वगळता इतर खासगी संस्था शाळेच्या विद्यार्थांकडून विनाकारण अवाजवी फी वसूल करत आहेत. फी न भरल्यास निकाल राखून ठेवणे व वारंवार पालकांकडे तगादा लावणे असे प्रकार शाळांकडून होत आहेत. या संदर्भात पालकांनी मनसेकडे धाव घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

त्या नुसार मनसेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने देऊन फी कपात विषयी पाठपुरावा करण्यात आला. यामुळे, शासनाने १५ टक्के फी कपात करण्याचा निर्णय ही सादर केला. शासनाने केलेली ही फी कपात म्हणजे जनतेची घोर फसवणूक केलीय.

केवळ १५ टक्के फी कपात करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत व महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या शिक्षण संस्था पोसण्यासाठी हा फी कपातीचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकस आघाडी सरकार ने घेतला आहे.

तो मनसेला मान्य नसून ५० टक्के फी कपात करावी अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे. तसेच अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24