जिल्ह्यातील ‘ या’ बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची ‘मनसे’ची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सद्यस्थितीत कोपरगाव बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बसस्थानकास ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री,

परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारे आणि सामान्य नागरिकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या बसस्थानकाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

त्यामुळे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव या बसस्थानकास द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीष काकडे,

उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, युवा नेते नवनाथ मोहिते, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी यांसह मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office