ना.रामदास आठवले पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर, बुधवारी श्रीरामपूरात नियोजन बैठक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक श्रीरामपूर येथे १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सांगितले की, येत्या १ ऑक्टोबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये नगरपालिकासह विविध संस्थांच्या निवडणुका होत आहेत.

त्याचबरोबर सभासद नोंदणी संदर्भामध्ये व येत्या १ ऑक्टोबरच्या कार्यक्रमा संदर्भामध्ये विचार विनिमय करण्या संदर्भामध्ये तसेच वीन पदाधिकार्‍यांच्या निवडी पक्ष प्रवेश सोहळा यासंदर्भात पक्षाच्या मुख्य कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव ,

राज्य सचिव विजयराव वाघचौरे, बाळासाहेब गायकवाड , दीपक गायकवाड , महेंद्र त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपूर येथील बुद्ध विहार येथे बुधवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित केलेली आहे.

या बैठकीस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय प्रमुख भिमराज बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मराठा आघाडी मुस्लिम आघाडी मातंग आघाडी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office