रस्त्यावर शेणाचा सडा देत मनसेने केला ‘ या’ पालिकेचा तीव्र निषेध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  सध्या कोपरगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे पालिका पदाधिकारी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसांत रहदारी वाढल्याने खड्डे व धुळीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीष काकडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२७) मुख्य भाजीपाला बाजार येथील गुरुद्वारा रोड रस्त्यावर शेणाचा सडा टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. कोपरगाव पालिकेतील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानत आहे.

यामुळे विकासकामांना खीळ बसत असून, लाखो रुपयांचा कर भरुनही शहरवासियांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शहरातील सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे पालिका पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत गुरुद्वारा रस्त्याची केवळ मलमपट्टी होत असल्याने या रस्त्यावर शेणाचा सडा टाकून तीव्र निषेध केला आहे. यावेळी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पालिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करुन तत्काळ सर्व रस्त्यांचे काम दर्जेदार आणि मजबूत करावे. कारण सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. गणपती, पोळा, दसरा व दीपावली सण काही दिवसांवर येऊन ठेेपले आहेत.

त्यामुळे पालिकेला लाखो रुपयांचा कर भरणार्‍या शहरवासियांना या समस्यांतून मुक्त करावे, अशी मागणी मनसे पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी केली आहे. या अनोख्या आंदोलनाची नागरिकांत चर्चा झडत आहे. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे,

उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, हिंदु सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, युवा नेते नवनाथ मोहिते, विक्रम काकडे, विकी चव्हाण, राजू भालेराव,विजय सुपेकर उपशहर अध्यक्ष वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे वाहतूक तालुकअध्यक्ष जावेद भाई शेख अजिंक्य काकडे आदी मनसे सैनिक सहभागी झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24