ताज्या बातम्या

मनसेने राज्यभर सुरू केली ही तयारी, पोलिसही सज्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा चांगला पेटताना दिसत असून महाराष्ट्र नव निर्माण सेनेने यासाठी राज्यभर वेगळीच तयारी सुरू केली आहे.

पोलिसांकडून होणारी संभाव्य कारवाई लक्षात घेता मनसेतर्फे राज्यभरात वकिलांची फौज तयार करण्यात येत आहे. अड, किशोर शिंदेच्या नेतृत्वाखाली राज्यभरात वकिलांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.

कार्यकर्त्यांवर कारवाई झाली तर त्यांच्या केसेस या वकिलांकडे सोपविण्यात येणार आहेत. मुंबई आणि पुण्यातील अशा याद्या तयारही झाल्या असल्याचे सांगण्यात येते.

तर दुसरीकडे पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे. अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनाही कलम १८८ नुसार नोटीस देण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याची तरतूद या कलमात आहे.

Ahmednagarlive24 Office