मनसेचा खासगी शाळांना इशारा…. नाहीतर रस्त्यावर उतरू…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच मनसे आक्रमक पणा भूमिका घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. यातच कोरोनामुळे प्रदीर्घकाळानंतर शाळा सुरु झाल्या मात्र खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात आता मनसे मैदानात उतरली आहे.

कॉन्व्हेंट शाळेचा माज खपवून घेणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमित वर्मा यांनी घेतली आहे.

अहमदनगर शहरातील कॉन्व्हेंन्ट शाळेची प्रवेशा बाबत महाविद्यालयाच्या आवारात नोटीस बोर्ड वर एक नोटीस महाविद्यालयाने चिकटवली आहे

या वादग्रस्त नोटिसबाबत आपण शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कॉन्व्हेंन्ट च्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून प्रवेशासाठी यावे अशी नोटीस विद्यालयाच्या परिसरात लावलेली होती

या मध्ये बुद्ध , जैन , शीख , पारशी , ख्रिश्चन , मुस्लिम अशी धर्माचा जातींचा उल्लेख आहे पण हिंदू धर्माचा उल्लेख का नाही? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

दरम्यान यावर बोलताना वर्मा म्हणाले, धर्माच्या नावाने प्रवेश प्रक्रिया यालाच आमचा विरोध आहे. येत्या दोन दिवसांत मनविसे शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार आणि जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था करु असा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office