अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यातील करोनाचा विस्फोट झाला आहे मात्र लोकप्रतिनिधींकडून करोनाग्रस्त रुग्णांना कुठल्याच प्रकारचे वैद्यकीय सेवेची पूर्तता होत नसल्याने अनेकांचे मृत्यू होत आहे.
निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी श्रीरामपूर येथे मनसेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले.
यावेळी कोरोनामुळे नागरिकांचे प्राण जात आहे, या सर्व नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार धरून पालकमंत्रीसह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील याना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
या काळात रुग्णांना बेड, इंजेक्शन ऑक्सीजन मिळत नाही. वैद्यकीय सेवाभावी रुग्णांचे मृत्यू होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत पालकमंत्री व जिल्ह्याचे इतर दोन मंत्री, खासदार. आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष. नगराध्यक्ष. पंचायत समिती सभापती व सर्व ग्रामपंचायत सरपंच
या सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी त्यांचा श्राद्ध घालून आजचे मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.