अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-पावसाळा तोंडावर आला आहे आजच केरळ मध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याने तर २० दिवसांनंतर पावसाळा सुरू होणार आहे .
असे जाहीर केले असताना देखिल महानगर पालिका आयुक्तांना अजुन नालेसफाई बाबत जाग आलेली दिसत नाही आहे दोन वर्षा पूर्वी सीना नदी बाजूचा सर्व परिसर पाण्यात गेला होता. खोकर नाल्याच्या बाजूचा, कुष्ठधाम नाल्याबाजुचा परिसर सुध्दा पाण्यात गेला होता.
घरांमध्ये पाणी शिरले होते घरातील सामानाची , वस्तूंची नुकसान, नासाडी पाण्यामुळे सर्व जीवनावश्यक साहित्य खराब झाले होते. हि सर्व पार्श्वभूमी असताना देखिल महानगर पालिका आयुक्तांना अजुन नालेसफाई, सिना नदी शहरातील छोटे, मोठे नाले सफाई करण्याबाबत जाग आलेली दिसतं
नाही त्यामुळे महानगपालिकेतर्फे लवकरात लवकर शहरातील नालेसफाई करावी जेणे करुण येणारा पावसाळा हा मोठ्या प्रमाणात आहे असे हवामान खात्याने अंदाज वर्तविला असुन अहमदनगर शहरातली नागरिकांच्या घरात पाणी घुसणार नाही समानांचे, वस्तूंचे नुकसान होणार नाही
तसेच महत्वाचे म्हणजे नदी काठचा परिसर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी व लवकरात लवकर नालेसफाईच्या कामाला सुरुवात करावी पाणी अडणार नाही त्याकरीता खोकार नाला, कुष्टधाम नाल्यावरील अनधिकृत पणे बांधलेल्या पुलांचे बांधकाम हटवावे जेणेकरून
पाण्याचा प्रवाह मोकळा वाहण्यास मदत होईल व शहरांतील पावसाचे पाणी तुबणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी. अशी विनंती मनसेच्या नितीन भूतारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.