अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ कुख्यात गुंडाच्या टोळीविरोधात मोक्का !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या सुरुवात केली आहे. आठ दिवसांपूर्वीच सराईत गुन्हेगार विश्वजित कासार

याच्यासह नऊ जणांच्या विरोधात मोक्का कैद्यांतर्गत करवाई करण्यात आली आता कुख्यात गुंड नयन राजेंद्र तांदळे याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्का लावला आहे.

या टोळीविरोधात सुपा पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकाकांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली.

टोळीप्रमुख नयन राजेंद्र तांदळे (२५, रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (२७, झापवाडी ता. नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (२३ रा. सावेडी, नगर), शाहुल अशोक पवार (३१) व अमोल छगन पोटे

(२८, दोघे रा. सुपा ता. पारनेर) अशी आरोपींची नवे आहेत. या टोळीच्या विरोधात सुपा, तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी करणे, जबरी चोरी करणे,

रस्तालूट, शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24