अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या जागतिक महामारीत भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम येथील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देऊन त्यावर लसीचे संशोधन करून त्याचा संपूर्ण जगाला पुरवठा करत १३० कोटी लोकसंख्येच्या महाकाय असलेल्या आपल्या देशातील १०० कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यात जगात आघाडी घेतली.
त्याबद्दल त्यांचे कौतूक करावे तेव्हढे थोडे असून त्यांच्या या मोहिमेचे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनात जग लॉकडाउन झाले असतानाही भारतवासियांच्या सुख-दुःखात साथ देत ८० कोटी जनतेच्या पोटात मोफत अन्नधान्याचा घास भरवला.
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीज, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जिनोव्हा बायोफार्मा, पॅनेशिया बायाडेट या सात भारतीय लस उत्पादक प्रमुखांशी चर्चा करून भारताबरोबरच जगाला त्याचा पुरवठा केला.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, राज्यमंत्री भारती पवार यांच्याबरोबरच १०० कोटी लसींचा टप्पा ओलांडण्यात भारतातील प्रत्येक रहिवाशांचा मोलाचा वाटा आहे. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज रहावे.
स्वत:बरोबर, परिसराचा, गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा राज्याचा आणि आपल्या देशाचा विचार करून सामूहिक प्रयत्नांची पराकाष्टा प्रत्येकाने करावी म्हणजे या संकटातून आपण सहीसलामत बाहेर पडू.
संजीवनी उद्योग समूह, संजीवनी युवा प्रतिष्ठान, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस, होमगार्ड सेवक, अंगणवाडी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळेच १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठता आला, असे कोल्हे यांनी सांगितले.