मोदी सरकार धोक्यात, कधीही मध्यवर्ती निवडणूका होऊ शकतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- केंद्रात सत्तेत असणारं मोदी सरकार हे धोक्यात आहे. कधीही मध्यवर्ती निवडणूका होऊ शकतात, असे भाकित इंडियन नॅशनल लोकदलचे (आयएनएलडीचे) सर्वेसर्वा ओम प्रकाश चौटाला यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना चौटाला यांनी मध्यवर्ती निवडणुकांबद्दलचं भाकित व्यक्त करताना, भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वच नागरिक संतापले आहेत, असं म्हटलं आहे. ओम प्रकाश चौटाला हे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुश्यंत चौटाला यांचे आजोबा आहेत.

शिक्षक भरती घोटाळ्याच्या आरोपाखाली २०१३ पासून तुरुंगात असणाऱ्या ओम प्रकाश चौटाला यांना दोन आठवड्यांपूर्वीच तुरुंगातून सोडण्यात आलं. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या चौटाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च २०२० पासून पॅरोलवर होते.

चोटाला म्हणाले,देशातील लोक सरकारच्या कारभारावर संतापले असल्याने लोकसभा निवडणुकींसाठी २०२४ ची वाट पहावी लागणार नाही. मध्यंतरीच्या काळात कधीही निवडणुका होऊ शकतात.

जानेवारी २०२१ मध्ये चौटाला यांचे पुत्र अभय सिंग चौटाला यांनी कृषी कायद्यांच्याविरोधात आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. सध्या आयएनएलडीचा एकही आमदार किंवा खासदार नाही. ओम प्रकाश चौटाला यांनी राज्यात सत्तेतवर असणाऱ्या भाजपा आणि जजपा सरकारवरही टीका केली आहे.

हे सरकारही २०२४ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही असं चौटाला म्हणाले आहेत. ही आघाडी कमकुवत झाल्याची टीका चौटाला यांनी केलीय.

या आघाडीतील पक्षांचे त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नसून इंडियन नॅशनल लोकदल सोडून तिकडे गेलेल्या नेत्यांना आता पश्चाताप होत असल्याचं सांगत अनेकजण पुन्हा आमच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं चौटाला म्हणालेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24