अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकर्यांनासंबंधित एका स्कीमबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले कृषिमंत्री :- नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की केंद्र सरकार देशात अंदाजे 6,880 कोटी रुपये खर्च करून 10000 शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करीत आहेत.
एफपीओमध्ये सामील झाल्यावर शेतीमधील खर्च कमी होईल आणि त्यांना उत्तम बाजार आणि एकात्मिक सिंचन सुविधांचा लाभ देखील मिळेल. एफपीओला शेतीसाठी 3 टक्क्यांपर्यंतच्या सवलतीत दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.
खासगी गुंतवणूक वाढवण्याच्या गरजेवर भर :- केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतीत खासगी गुंतवणूक वाढवण्याच्या गरजेवर भर दिला आहे. तोमर म्हणाले की, लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. देशातील 86 टक्के शेतकरी लहान शेतकरी आहेत.
ते म्हणाले की, गावांच्या आत्मनिर्भरता आणि कृषी क्षेत्राच्या विकासाची कल्पना त्यांच्या सक्षमीकरणाशिवाय करता येणार नाही. तोमर म्हणाले की, केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे की लहान व मध्यम शेतकरीसुद्धा महागडी पिके घेतील आणि जागतिक दर्जाच्या पिकाची शेती करण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाचा फायदा घेता येईल.
ते म्हणाले की, आत्मनिभार भारत पॅकेजअंतर्गत कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून यामुळे कोल्ड स्टोरेज व गोदामांसारख्या मूलभूत सुविधा खेड्यात आणण्यास मदत होईल.