मोदी म्हणतात कोरोना आपली परीक्षा घेतोय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र हाहाकार माजला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ही महामारी देशाच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत असल्याची भावना व्यक्त केली.

‘देशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केला. त्यानंतर आपण नव्या दमाने सुरुवातही केली. पण, या नव्या वादळाने देशाला हादरवून टाकले.

ही महामारी देशाचे धैर्य व आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहे’, असे ते म्हणाले. ‘देश कोरोनाच्या संकटावर लवकरच मात करेल’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मन की बात’मध्ये मोदींनी मुंबईच्या डॉक्टर शशांक यांच्याकडून पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अंतर जाणून घेतले.

त्यावर शशांक यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट केले. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही यावेळी अधिक असल्याचे स्पष्ट केले.

‘लोक कपडे बदलतात तसा व्हायरस आपला रंग बदलत आहे. पण, कुणालाही घाबरण्याची गरज नाही. देश यावरही मात करेल’, असे ते म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24