मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपने (BJP) ५ पैकी ४ ठिकाणी विधासभेवर कब्जा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेते महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांना डिवचायची एकही संधी सोडत नाहीयेत.
महाविकास आघाडी सरकारचे आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत भाजप नेत्यांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कंबोज यांनी संजय राऊत यांचा हार्मोनियम वाजवताना चा फोटो ट्विट केला. त्यामध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं असा आशय भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट मध्ये लिहला आहे. त्यामुळे संजय राऊत हे या ट्विटला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आशिष शेलार यांनीही निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा विजय आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाला आहे.
राज्यातील सत्ता बदलावर मी बोलणार नाही, मात्र त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील बोलतील. असेही शेलार म्हणाले आहेत.
त्याचबोरबर नक्कीच मुंबई महानगरपालिकेवर देखील सत्ता बदल होणार आणि भाजपची निर्विवादपणे सत्ता येणार असा छातीठोक दावाही आशिष शेलार यांनी केला आहे.