अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-मोहटादेवी सुवर्णयंत्र व फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पंडित जाधव (रा.सोलापुर) व संदीप पालवे (रा.मोहटा) यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी येथील न्यायाधीश अस्मिता वानखडे यांनी सुनावली आहे.
इतर बावीस आरोपींना अटक करावयाची आहे व सोन्याची सिद्धता तपासायची असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर शुक्रवारी करण्यात आला.
मोहटादेवी मंदीराच्या उभारणी करताना इमारतीच्या पायात सुवर्णयंत्र बसविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी सुवर्णयंत्र बनविणार पंडित जाधव व त्यावेळचे विश्वस्त संदीप पालवे यांना अटक केली आहे.
शुक्रवारी येथील न्यायाधीश अस्मिता वानखडे यांच्यासमोर दोघांना हजर करण्यात आले.यावेळी तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे उपस्थीत होते.
सरकारी वकील ॲड.शिवाजी दराडे यांनी सरकारी पक्षाचे म्हणणे मांडले. वानखडे यांनी जाधव व पालवे यांना दि.१७ फ्रेबुवारी २०२१ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहेत.
या प्रकरणातील बहुतेक आरोपी हे वयोवृद्ध आहेत. तहसीलदार, गटविकास अधिकारी, न्यायाधीश, वनअधिकारी यांच्यासह वकील मंडळीचा आरोपीमध्ये समावेश असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
त्यावेळीच्या काही विश्वस्तांनी या सुवर्णयंत्र प्रकरणाला विरोध नोंदविलेला आहे. तर काहीजण त्यावेळी झालेल्या बैठकीला उपस्थीत नसल्याचे समजते. मोहटादेवी प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने कारवाई वेगाने होत आहे.
अजुनही २२ जणाला अटक कारवयाची आहे. जिल्हा न्यायाधीशांचा आरोपीमध्ये समावेश असल्याने त्यांच्या अटकेसाठीच्या तांत्रीक बाबी पूर्ण करण्यात वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा वेळ जात आहे.