मोकाट कुर्त्यांचा सुळसुळाट, नागरिकांच्या झोपा उडाल्या …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अकोले शहरात मोठया प्रमाणावर भटक्या कुर्त्यांचा सुळसुळाट अचानकपणे वाढला आहे. मध्यंतरी संगमनेर नगरपालिका क्षेत्रातील पकडलेले मोकाट कुत्रे जंगलात सोडण्याच्या नावाखाली एका टेंपोत भरून अकोले तालुक्यात पाठविण्यात आले.

संबंधित टेम्पो चालकाने तालुक्यातील कळस, कुंभेफळ, रेडे परिसरात काही कुत्रे सोडत असताना कार्यकर्ते व नागरिकांना आढळून आले. यावेळी जागृत कार्यकर्त्यांनी हा टेंपो पोलीस ठाण्यात आणला;

मात्र नेहमीप्रमाणे जुजबी कारवाई करून टेंम्पो व चालकास सोडून देण्यात आले होते. त्यानंतर अकोले नगर पंचायतने शहरातील कुत्रे पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. पण यात काही खासगी कुत्रे पकडले गेल्यामुळे कुरबुरी झाल्या होत्या.

तेंव्हा काही भागातील मोकाट कुत्रे अकोलेतून गायब झाले होते, त्यामुळे अबाल वृद्धांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता; मात्र त्यावेळी झालेल्या वादामुळे अकोले शहरातील कोल्हार घोटी रस्ता, महालक्ष्मी, दुधगंगा कॉलनी, शेकईवाडी परिसरातील कुत्रे पकडले गेले नव्हते.

गेल्या आठवडाभरापासून पुन्हा शहरातील विविध भागांत कुर्त्यांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. एक नव्हे तर सात ते आठ कुर्त्यांचा घोळका रस्त्यावरून फिरत असतो. शालेय, महाविद्यालयात ये-जा करणारे विद्यार्थी,

सायंकाळी फिरायला बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यावर हे कुत्रे भुंकत व धावून जात असतात, त्यामुळे अबाल वृद्धांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरून हे कुत्रे अकोले शहरात आणून सोडले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यातील काही कुत्रे पिसाळलले आहेत. ते अन्य माणसांबरोबरच स्थानिक कुर्त्यांवर हल्ले चढवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सध्या कचेरी रोड, धुमाळवाडी रोड, कॉलेज रोड, महालक्ष्मी कॉलनी परिसर, नाईकवाडी वाडा, चिरेबंदी परिसर, कमानवेस,

कारखाना रोड, खटपट नाका, बाजारतळ, बसस्थानक, बाजारपेठ, मॉर्डन हायस्कुल व ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेजवळ या कुर्त्यांचा समूह नागरिकांना आढळून येत आहे. हे कुत्रे अगदी रस्त्यावरच उभे राहत असल्याने लहान मुले,

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांना कुत्रे निघून गेल्याशिवाय रस्ता पार करता येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पिसाळलेले कुत्रे चावले तर अनेकांना उपचारासाठी मोठा खर्च येत असतो.

काहींना तर कुत्रे चावल्याने मृत्यूला सुद्धा सामोरे जावे लागते.ही कुत्रे रात्रीच्या वेळेस मोठं मोठयाने भुंकत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24