झाडूकाम करणाऱ्या महिलेचा तरुणाकडून विनयभंग; शहरातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- महिला अत्याचार, हिंसाचाराच्या घटनां आजही घडताना दिसून येतच आहे. यामुळे महिलांची सुरक्षा व अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. नुकतेच शहरातील एक घटना समोर आली आहे.

नगर शहरात झाडूकाम करणार्‍या 40 वर्षीय महिलेसोबत तरुणाने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. भिस्तबाग चौक परिसरातील लालगुलाब कॉलनी रोडवर बुधवारी सकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी संबंधित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयूर आबासाहेब गायकवाड (रा. वाणीनगर, सावेडी) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी फिर्यादी महिलेने म्हंटले आहे कि, बुधवारी सकाळी लालगुलाब कॉलनी रोडवर झाडूकाम करत होत्या. त्याठिकाणी मयूर गायकवाड आला.

त्याने फिर्यादी महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले व तू येथे झाडायचे नाही, असा दम दिल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. पानसरे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24