नौकरी देण्याच्या बहाण्याने विवाहितेचा विनयभंग; शहरातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नोकरी मिळावी यासाठी शहरातील MIDC मध्ये फिरणाऱ्या एका विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर शहरातील मार्केट भागात 24 वर्षीय विवाहिता राहते.

दारुड्या पतीमुळे कुटुंबाची वाताहत होत असल्याने पीडितेने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरी शोधण्यासाठी ती नगरच्या एमआयडीसीत फिरत होती.

त्यावेळी तेथे तिची गिरीष बच्चासोबत ओळख झाली. तिने बच्चाकडे नोकरीविषयी विचारणा केली. त्यावेळी त्याने माझ्या मित्राची कंपनी असून त्याला सांगतो असे म्हणत तिला भेटण्यासाठी बोलविले.

5 तारखेला ही विवाहिता पुन्हा एमआयडीसीत बच्चाकडे गेली. बच्चा याने तिला त्याच्या मोटारसायकलवर बसून एमआयडीसीत फिरविले. एका झुडपाजवळ मोटारसायकल थांबवून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले.

त्याच्या हाताला झटका देऊन विवाहितेने सुटका करून घेतली. त्यानंतर घडला प्रकार तिने घरी सांगितला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिच्या फिर्यादीवरून बच्चा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24