अल्पवयीन मुलीचा विनयभंग; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी गावांतर्गत असलेल्या बाळंद्री येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळंद्री येथील सतरावर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून आरोपी विक्रम मधुकर ताजणे (रा.कुमशेत, ता.जुन्नर, जि.पुणे) याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विक्रम ताजणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक राहुल मदने हे करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24