Money Transfer Refund : फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm) यांसारखे पेमेंट ॲप्स (Payment apps) आल्यापासून अनेकजण यावरून आर्थिक व्यवहार (Financial transactions) करतात. स्मार्टफोन वापरणारे जवळपास सगळेजण हे ॲप्स वापरतात.
परंतु, काहीवेळा UPI वरून (UPI) चुकीच्या खात्यात पैसे (Money transfer) जातात. जर तुमचेही चुकीच्या खात्यात गेले तर काळजी करू नका. केवळ दोन दिवसात तुम्हाला पैसे परत मिळतील.
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात
अनेक वेळा असे ऐकले आहे की पैसे पाठवताना ते दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर होतात. तुमच्यासोबत असे घडल्यास, तुम्ही तुमचे पैसे 24 तासांच्या आत परत मिळवू शकता. यासाठी आरबीआयने (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात
UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला मिळणारा मेसेज सेव्ह करा. जर मेसेज डिलीट झाला तर पैसे रिफंड करण्यात खूप अडचणी येतील. व्यवहार पुष्टीकरण संदेशामध्ये PBBL क्रमांक असतो.
पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे. आरबीआयने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्ही http://bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता.
या प्रक्रियेनंतर, तुम्हाला बँकेकडे अर्ज देखील लिहावा लागेल. अर्जामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, नाव, ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्या
जर तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर सर्वप्रथम हेल्पलाइन नंबरवर त्याची माहिती द्या. तुमचे खाते असलेल्या बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुम्ही चुकीच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्यावी.
या प्रकरणी बँकेच्या शाखेत जाऊन मॅनेजरशीही बोलू शकता. बँकेच्या प्राप्तकर्त्याने दुसऱ्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी बोलल्यास लवकरच पैसे मिळण्याची आशा आहे.