UPI Money Transfer : चुकीच्या आयडीवर पैसे ट्रान्सफर झालेत? काळजी करू नका; लगेच करा ‘हे’ काम, मिळतील पैसे परत

UPI Money Transfer : GPay, PhonePay आणि Paytm सारख्या पेमेंट ॲप्समुळे बँकेत चकरा माराव्या लागत नाही. कुठे आणि कधीही या ॲप्समुळे आर्थिक व्यवहार करता येतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे अनेकजण या ॲप्सचा वापर करत असतात. परंतु, अनेकदा या ॲप्समुळे चुकीच्या आयडीवर पैसे ट्रान्सफर होतात. जर तुमच्यकडूनही ही चूक झाली असेल तर आता काळजी करू नका, कारण तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतात.

NPCI मोबाईल नंबर किंवा एखाद्या QR कोड वरून बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास अनुमती देते. वापरकर्ते कोणत्याही ॲपद्वारे पेमेंट करू शकतात. अनेकदा वापरकर्ते दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे पाठवतात. ही समस्या सामान्य नसून चिंताजनक आहे कारण एकदा पैसे पाठवल्यानंतर ते परत मिळत नाही असे अनेकांना वाटते. तुम्हाला तुमचं पैसे मिळू शकतात.

Advertisement

फॉलो करा या स्टेप्स

ॲपद्वारेच सपोर्टशी संपर्क करा

याबाबत RBI ने काही मार्गदर्शक तत्त्वे जरी केली आहेत. या तत्त्वांनुसार, वापरकर्त्याने प्रथम पेमेंट सेवा प्रदात्यासोबत अनवधानाने व्यवहार झाल्याची तक्रार करायला हवी. कोणत्याही UPI ॲपच्या ग्राहक सेवा समर्थनासह तुमची समस्या मांडा. ग्राहकांना मदत देण्यासाठी सेवा प्रदात्यांची स्वतःची यंत्रणा असते. तुम्हाला तुमचे पॅसीए पार्ट मिळू शकतात.

Advertisement

हेदेखील पर्याय वापरा

  • तुम्ही NPCI पोर्टलवर तक्रार करू शकता.
  • बँकेशी संपर्क साधता येतो
  • त्याशिवाय बँकिंग लोकपालशी संपर्क साधा. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणाऱ्या डिजिटल व्यवहारांसाठी
  • RBI ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

दररोज कित्येक वापरकर्त्यांकडून चुकीच्या आयडीवर पैसे ट्रान्सफर होतात. दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेकांना ट्रान्सफर झालेले पैसे परत मिळवण्याची पद्धत माहिती नसते, त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.

Advertisement