मान्सूनचे आगमन लांबणीवर… पावसाचे आगमन कधी होणार? जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतं आहे.

वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय नसल्याने तसेच पुरेसे बाष्प नसल्याने केरळतील माॅन्सूनचे आगमन लांबले आहे. 3 जूनपर्यंत माॅन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा मॉन्सून 1 जूनच्या आधीच केरळात दाखल होणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता.

परंतु आता 1 जून नंतर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तो साधारणतः 3 जूनपर्यंत केरळात दाखल होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या ५ दिवसात पाऊस पडू शकतो.

आयएमडीचे माजी प्रमुख हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. केरळात मान्सून 3 जूनला तारखेला दाखल होईल मात्र राज्यातील परिस्थिती पाहता तो वेळेत न येता चार पाच दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24