अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरु असला तरी आता कोरोनामागी होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे, यामुळे काहीशी दिलासाजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात 168 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1538 रुग्ण अॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 164 होती. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 12458 रुग्णांना करोनाची लागण झाली होती.
तर त्यातील सुमारे 10801 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच स्वतःही व परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे.