अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये या आठवड्यात केवळ तीन दिवसांमध्ये 2 लाख 9 हजार 519 गोण्या इतकी आवक झाली आहे.
दरदिवशी हजारोंच्या संख्येने कांद्याची आवक होत आहे. दोन महिने मार्केट बंद राहिल्याने व कांदा लवकर खराब होण्याची शक्यता वाटू लागल्याने बाजारात कांद्याची मोठी आवक होत आहे.
दरम्यान सोमवारी 65 हजार 622 गोण्या, बुधवारी 70 हजार 248 गोण्या (39 हजार 330 क्विंटल) तर काल शनिवारी 73 हजार 649 गोण्या (41 हजार 86 क्विंटल) इतकी आवक झाली.
जाणून घ्या बाजारभाव :- या आठवड्यात कांद्याचे भाव 2400 रुपयांपर्यंत स्थिर राहिले. शनिवारी मोठ्या मालाला 2000 ते 2100 रुपये भाव मिळाला मध्यम मोठ्या मालाला 1800 ते 1900 रुपये,
मध्यम मालाला 1600 ते 1700 रुपये प्रतिक्विंटल तर गोल्टा/गोल्टी कांद्याला 1000 ते 1500 रुपये भाव मिळाला. तीन-चार वक्कलला 2300 ते 2400 रुपयांपर्यंत भाव मिळाला.