अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. आणि या लसीकरणाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभतो आहे.
यामुळे भारताने लसीकरणात विक्रम केले आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 32 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे.
देशात लसीच्या एकूण 32,17,60,077 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात लसीच्या 64,25,893 मात्रा देण्यात आल्या. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली.
देशात गेल्या 24 तासात 50,040 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सलग 20 व्या दिवशी दैनंदिन नव्या कोविड रुग्णांची संख्या 1 लाखाच्या खाली नोंदविण्यात आली. भारत सक्रिय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे.
देशात सक्रिय रुग्णसंख्या आज 5,86,403 आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 9,162 रुग्णांची निव्वळ घट झाली असून देशात नोंद झालेल्या एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण आता केवळ 1.94% आहे.333+